
देवगड : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे,यासाठी असे समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा मुख्य हेतू असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अजित गोगटे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवगड मंडळाचे सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर तसेच पाणीपुरवठा सभापती व प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या वतीने देवगड-जामसंडे शहरातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे बोलत होते.
यावेळी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळ खडपे,मंडळ अध्यक्ष राजा भूजबळ, महिला मंडळ अध्यक्षा उषकला केळुसकर, शहराध्यक्ष वैभव करगुंटकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठुकरूल, नगरसेविका रुचाली पाटकर व मनिषा जामसंडेकर, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर, शक्ती केंद्र प्रमुख सुभाष धुरी, राजेंद्र वालकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, संजय तारकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे, बूथ अध्यक्ष रविंद्र चिंदरकर, नरेश डामरी, ललित चांदोस्कर, शिक्षकवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची महत्त्वपूर्ण मदत मिळाली असून पालकांनी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त केले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.या उपक्रमाला पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.











