
देवगड : देवगड तालुक्यात सोमवारी (दि. २३ जून) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मौजे फणसगाव येथील बौद्धवाडीमधील पंचशील बुद्धविहाराचे नुकसान झाले. सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे बुद्धविहारावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून पाहणी करण्यात आली असून, नुकसानग्रस्त मालमत्तेची सविस्तर पंचनामा अहवाल स्वतंत्रपणे सादर करण्यात येणार असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, देवगड तालुक्यात दि. २३ जून रोजी २७ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान ४८८ मिमी इतके झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.











