LIVE UPDATES

जिल्हा वीज ग्राहक संघटनेची आज तातडीची बैठक

विषय स्मार्ट मीटरचा
Edited by:
Published on: July 13, 2026 09:47 AM
views 52  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची सभा आज 13 जुलै 2026 रोजी शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार लाख 4 हजार एकूण वीज ग्राहकांपैकी एक लाखापेक्षा जास्त वीज ग्राहकांना जबरदस्तीने लावण्यात आलेले वीज मीटर याबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे.


स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्यातील 98% वीज ग्राहकांना अवाजवी वाढीव बिले आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेकडे अनेक लेखी तोंडी तक्रारी आलेल्या असून या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आजच्या निर्णायक बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पीडित वीज ग्राहक, सर्व सरपंच तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांनी लेखी तक्रारीसह उपस्थित रहावे असे आवाहन संजय लाड, अध्यक्ष व साईनाथ आंबेरकर, सचिव सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना यांनी केले आहे.