
कणकवली : शहरातील प. पू. नियादेवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रम येथे बुधवार २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. प. पू. भालचंद्र महाराज, फलाहारी बाबांच्या पादुकांचे पूजन, ११ वा. प. पू. देवी अनुसया माता यांच्या समाधीचे पूजन, दुपारी १२ वा. भजन, १ वा. आरती, तीर्थप्रसाद, १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी प. पू. देवी अनुसया माता विश्रांती धाम महिला मंडळाचे भजन, रात्री ८.३० वा. शेज आरती होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










