
कणकवली : कलमठ बिडयेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात बुधवार २९ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. पूजा, अभिषेक, लघरुद्र, लघुयाग व धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. धुप आरती, सायंकाळी ५.३० वा. बिडयेवाडीतील १० व १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सायंकाळी ७ वा. भजन, रात्री ८ वा. स्वामी समर्थांचे नामस्मरण, आरती होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सेवेकरांनी केले आहे.










