LIVE UPDATES

देवगड तालुका महिला व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी प्रियांका साळसकर

नवीन कार्यकारिणी जाहीर : कार्यकारिणीवर महिला उद्योजिका व व्यापाऱ्यांना संधी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 26, 2026 20:36 PM
views 30  views

देवगड : देवगड तालुका महिला व्यापारी संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते जाहीर करण्यात आली. यामध्ये संघाच्या अध्यक्षपदी प्रियांका साळसकर यांची फेरनिवड करण्यात आली असून, नव्या कार्यकारिणीवर विविध भागातील महिला उद्योजिका व व्यापाऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी मनीषा उत्तम पोकळे (देवगड), स्वरूपा समीर सोमण (मिठबाव) आणि उर्मिला मणचेकर (पडेल) यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी वैशाली मनोज हडकर, तर सहसचिवपदी कृपा जितेश भद्रा यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून तृप्ती प्रसाद पारकर, शीतल शैलेश कदम, वैष्णवी सुधाकर जोईल, मनीषा रमेश पाटील, ऋचा राजेश पोकळे, शमा सुनील कुळकर्णी, स्मिता तुषार पवार, सानिका शुभम कुळकर्णी, कु. चिन्मयी वैभव बिडये, प्रिया मधुकर नलावडे, स्नेहा सदानंद हिंदळेकर, प्राजक्ता प्रशांत बांदेकर, अनघा अमोल काणेकर, गीतांजली सचिन हळदणकर, स्वरा सुधीर पारकर, दिपाली नितीन घाडी, कु. शीतल सुरेश तावडे, मंजिरी मधुसूदन काळे, माधवी मधुकर लडगे, तन्वी योगेश चांदोस्कर, पूजा प्रसाद वाडेकर, सुप्रिया पांडुरंग लिमये, सायली संतोष माणगावकर, प्रीतम प्रकाश कोळंबकर आणि माधुरी विश्वामित्र खडपकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य प्रसाद पारकर यांनी नूतन महिला कार्यकारिणीचे अभिनंदन करून सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील महिला उद्योजिका आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे तसेच व्यापारी क्षेत्रात महिलांचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.