
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व विषय समिती सभापतींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभास संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर, जिल्हा सरचिटणीस नितीन जठार, राज्य उपाध्यक्ष गुंडू चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष धोंडू बाबू रेडकर, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव अनंत मराठे, जिल्हा सहसचिव प्रकाश कोचरेकर, वैभववाडी तालुका सरचिटणीस प्रशांत रासम, सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष सौ. वसुंधरा चव्हाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उदय शिरोडकर आदींसह जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील अनेक मान्यवर सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते. यावेळी संघटनेच्यावतीने नुतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.











