
देवगड : देवगड तालुक्यातील गोगटे सांस्कृतिकभवन,जामसंडे येथे महाराष्ट्र शासन कृषि महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास पालकमंत्री नितेश राणे हे उद्घाटक म्हणून लाभले आहेत.
महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्यावतीने शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी कै.मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन,जामसंडे, ता. देवगड येथे सकाळी १० ते ६ या वेळेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषि महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कृषी प्रदर्शनाचे आयोजन, तथा तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आली आहेत. तसेच आयोजित करण्यात आलेल्या या कृषी महोत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शिवाजीआमले विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे., डॉ. वैभव शिंदे सहयोगी संशोधन संचालक, प्रा. फ. सं. के. वेंगुर्ला,भाग्यश्री नाईकनवरे जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग उमाकांत पाटील उपविभागीय कृषीअधिकारी कणकवली यांची उपस्थिती लाभणार आहे.तर महाराष्ट्र शासन कृषि विभागराष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान पौष्टिक तृणधान्य उपअभियान अंतर्गत या कृषी महोत्सवात विविध कृषि उत्पादनांचे प्रदर्शन.
महिला बचत गटांची उत्पादने.
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री.
शासकीय योजनांचे दालन.
शेतकरी सन्मान सोहळा.
शेती औजारे व आधुनिक शेती
तंत्रज्ञान प्रात्याक्षिके.
महाविस्तार AI नोंदणी.
ही या कृषी मोहोत्सवाची प्रमुख वैशिष्टे असणार आहेत तर यावेळी कृषि प्रदर्शन व मान्यवरांची चर्चासत्रे.देखील आयोजित करण्यात आली असून तृणधान्य, फळपिके व भाजीपाला प्रदर्शन व मार्गदर्शन व चर्चासत्रे या निमित्ताने आयोजित करण्यात आली आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक लाभले आहेत डॉ. वैभव शिदे सहयोगी संशोधन संचालक, प्रा. फ. सं. के. वेंगुर्ला विषय - मसाला पीक व्यवस्थापन,मार्गदर्शक-मिलिंद जोशी उप सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळविषय - मँगोनेट व नियति मार्गदर्शक-यशवंतगव्हाणे उपकृषि अधिकारीसावंतवाडीविषय -आंबा पुनरुज्जीवन मार्गदर्शक-संदीप चोरगे संचालक अँग्रीकार्ट कंपनी विषय- स्थानिक वाण संवर्ध मार्गदर्शक-नयन चेंदवणकरप्रगतशील शेतकरी विषय - मधुमक्षिका पालनयावेळी या शिबिरास शेतकऱ्यांसाठी खास आकर्षण भव्य लकीड्रॉ चे देखील आयोजन या निमित्ताने करण्यात आले असून या शिबिरसा मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या संपूर्ण कार्यक्रमाचं लाभ घ्यावाअसे आवाहन या शिबिराचे आयोजक तालुकाकृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले आहे.











