LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत, उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज यांची निवड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 30, 2026 19:43 PM
views 44  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ या संस्थेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. गुरुवारी ओरोस येथील कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. टी. चौगुले यांनी काम पाहिले. या निवडणूकीत अध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत तर उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज यांची बिनविरोध निवड झाली.. 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कार्यक्रम पार पडला. मनीष दळवी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सावंत व उपाध्यक्ष श्री. मर्गज यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी "आपण व आपले सर्व सहकारी यांचे मार्फत मंडळास आवश्यक ते योग्य सहकार्य करू" असे मत श्री. दळवी यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या पोषक वाढीसाठी व सहकारी संस्था सक्षम बनविण्यासाठी सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना कार्यक्षम बनविण्यासाठी बदलत्या काळानुसारचे सहकारी शिक्षण-प्रशिक्षण सहकारी मंडळामार्फत देणेत येईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन सावंत व उपाध्यक्ष विनोद मर्गज यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये विलासराव बा. ऐनापुरे, गजानन सु. गावडे, मधुसुदन के. गावडे, सुभाष रा. तळवडेकर, केशव र. नारकर, प्रकाश मु. सावंत, सुरेश ज्ञा. चौकेकर यांचा समावेश आहे. तर संचालिका कुंदा प्र. पै, प्रज्ञा प्र. परब. यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी मंगेश रा. पांचाळ उपस्थित होते.