
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या प्रदेश कार्यसमीतीची दोन दिवसीय बैठक आणि कुडाळ एम.आय. डी.सी येथे होणारे कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन हे कोकणच्या औद्योगिक क्षेञाच्या विकासाच्या द्रुष्टीने महत्त्वपूर्ण आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चेंबरच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच नियोजन करावे असे आवाहन कोकणचे सुपूञ व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरचे ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर यानी केले. १५ व १६ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात याचे आयोजन करण्यात आले आहे.
आज कुडाळ एम.आय.डी.सी येथील विश्रामगृहात चेअरमन आशिष पेडणेकर यांनी आढावा बैठक घेतली व कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सुचना केल्या. यावेळी चेंबरचे कोकण विभागीय उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजन नाईक, अॅड नकुल पार्सॅकर, विशाल कामत, कुणाल ओरसकर आदी उपस्थित होते.











