
कुडाळ : अंधकारातुन प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग सदगुरू आहेत. सेवाभावी भक्तीतून दुसऱ्याची सेवा केली पाहिजे तरच आपली परमेश्वर रुपी भेट होते असे प्रतिपादन श्री श्री 108 महंत मठाधीश प पू.सदगुरू गावडे काका महाराज यांनी माडयाचीवाडी येथे गुरूपौर्णिमा सोहळ्यात केले. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी श्री स्वामी मठात भूमीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते व त्यानी दर्शन घेतले.
कुडाळ तालुक्यातील माडयाचीवाडी खालचीवाडी येथील श्री श्री 108 महंत मठाधीष परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटे संकल्प, गुरु मंत्र, सकाळी स्वामींच्या मूर्तीवर धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा व आरती श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्यानंतर गुरु संदेश दुपारी सदगुरू दर्शन सोहळा व अखंड महाप्रसाद आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काकांच्या पाद्यपूजेचा मान यावर्षी सावंतवाडी उपासना केद्राला देण्यात आला होता. सावंतवाडीतील उद्योजक चंद्रशेखर पोकळे यानी पाद्य पूजा केली.
यावेळी श्री सदगुरू भक्त सेवा न्यास रजि माड्याची वाडी अध्यक्ष एकनाथ गावडे, सामाजीक संस्थेचे अध्यक्ष राकेश केसरकर, पंकज कामत, सुजय गावडे, गौरव मुंज, सचीन धावडे, भास्कर गावडे, राजन गावडे, विजय साहील, नामदेव गावडे, बापू गावकर, केसर वानीवडेकर, प्रिती कुशे, रश्मी डिचोलकर, बाबा गावडे, मनीष नाईक, गिरीधर गावडे, देवीदास रेडकर, साई पेडणेकर, आनंद सावंत, दत्तात्रय किंनळेकर, कृष्णा पाटकर, तानाजी पाटील, नितीन पिंगुळकर, तुकाराम आमुनेकर, राजु वाळके, अंजली पावसकर, तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते
गावडेकाका महाराज यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात वावरताना एक माणूस म्हणून जगा, माणुसकी म्हणून जगा. गरिबांची सेवा करा त्यांच्या मदतीला धावून जा. पाप पुण्याच्या विळख्यातून पापांतून बाहेर पडत पुण्य कर्म करा. हीच माझ्यासाठी तुम्ही दिलेली गुरूदक्षिणा आहे. गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असते. गुरु शिष्याचे नाते दृढ करण्याचा, ज्ञानाचा उगम जिथे होतो. जीवनाची परिपूर्णता ज्या ठिकाणी तयार होते. जीवनाची वाटचाल जिथे तयार होते, कौटुंबिक वातावरणात आनंद निर्माण होण्याचा मार्ग ज्या ठिकाणी मिळतो. दुःख आणि संकटावर ज्या ठिकाणी मात करण्याचा आशीर्वाद आणि शक्ती मिळते , मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग मिळविण्याचं व मनाला एकाग्रता ज्या ठिकाणी मिळते ते ठिकाण म्हणजे सदगुरूचे चरण. हेच गुरुचे महत्त्व असते. आपण जन्माला आलो की आपणाला पहिले गुरू भेटतात ते आपले आई वडील, त्यानंतर आपले शिक्षक होय. आपल्या तारुण्याचा जीवनामधला आनंद घेत असताना यशस्वी जीवनाच्या पायरीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवून प्रपंचाची सुरुवात होते आणि या प्रापंचिक वळणावर प्रापंचित आनंदाच्या ठिकाणी जे ज्ञानप्राप्त करून देण्यासाठी प्रपंच कसा करावा ,त्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते.अध्यात्मिक सदगुरु आपणाला चांगल्या वळणावर नेतात व शेवटच्या क्षणापर्यंत आपणाला मायेने व ममतेने वात्सल्याने, दिव्यत्वाचा संदेश देत असतात. आपणाला परमेश्वराची ओळख करून देऊन या परमेश्वराचं खरं रूप दाखवितात. उपासना म्हणजे परमेश्वराची सेवा या सेवेचे महत्व पटवून देतात. आपणाला साधक बनवितात. समाजाची सेवा हाच समाज रुपी परमेश्वर आहे. असे मार्गदर्शन करत असतात गुरुची कृपा व गुरुचा आशीर्वाद हाच मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग आहे. गुरुंनी दिलेला शब्द हा अंतिम सत्य आहे, वेगवेगळ्या सेवेतुन गुरु आपल्याला ज्ञान देत असतात असे गुरु शिष्यबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
समाजाच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी योग भवन उभ राहणं हीच तुमच्याकडून मी गुरुदक्षिणा मागत आहे. भव्य योग भवनाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. समाजासाठी योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी रोगानुसार योगा ही संकल्पना प्रत्यक्षात राबविली जाईल. या राष्ट्र सेवेत आपण सर्वांनी सहभागी व्हा. मन हि एक अदभूत शक्ती.
कार्यशाळेतून यशस्वी झालेल्या दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थाचा सन्मान करण्यात आला. दहावी कु. दिया निलेश सामंत 100 टक्के, कु. विजय बाबाजी मेस्त्री90 टक्के, कु.धनश्री प्रवीण कांदळगावकर 86.60टक्के, कु सुरज संतोष मसुरकर 85.80टक्के, कु. संस्कृती सुधन नाईक 85.05 टक्के, बारावी कु कुमार हर्षित प्रशांत कदम 71 टक्के तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ व श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या सामाजीक संस्थेच्या माध्यमातून योग अभ्यास वर्ग डिल्पोमा कोर्स चालवीला जातो यामध्ये यशस्वी विद्यार्थाचा गुण गौरव करण्यात आला. यामध्ये प्रसाद भास्कर मडगावकर 79 टक्के, रितिका काशीराम जळवी 77.50 टक्के, दीपा विष्णू परब75.67 टक्के, देश रामचंद्र आजगावकर 75.09 टक्के, तसेच वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या अनी काका जीच्या हातून गेली कित्येक वर्ष या मुख्य शक्ती पिठात नैवैद्य बनवीला जातो. या ईश्वरी सेवेसाठी या माऊलीला व श्यामा गावडे हि माऊली मन हि एक अदभूत शक्ती या कार्यशाळेतून दहावी व बारावी विद्यार्थाना मार्गदर्शन केले जाते. या यशस्वी विद्यार्थाना कौतूकाची थाप म्हणून याच्या माध्यमातून आर्थीक सहाय्यातून गुणगौरव केला जातो. त्याच्या पशयात सुध्दा हा गुणगौरव आपल्या माध्यमातून व्हावा म्हणून त्यानी सस्थेकडे तजवीज केलेली आहे. या माऊलीलाही सन्मानीत करण्यात आले.

तसेच सांताक्रुज केंद्रांसाठी संस्थेची स्वत:ची वास्तू व्हावी यासाठी विषेश पुढाकार घेणारे संस्थेचे विश्वस्त सचीन धावडे यांचा सदगुरूच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सांताक्रूज उपासना केंद्राची वास्तू उभी करण्यासाठी दातृत्व भावनेने सहाय्य करणा-या तेजाळे काकींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात दातृत्व भावनेने कणकवली शहरात कणकवली उपासना केद्रासाठी भूदान देणारे गणपत सिता कांत आळवे यांना सदगुरूच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. चित्रकार ज्ञानदेव हडकर(मालवण मसुरे) यांनी सदगुरू गावडेकाकांना त्यांच्या स्वत:च्या हाताने सदगुरू गावडे काका सुदंर असे आकर्शक पोट्रेट काकांना भेट दिल. याबंद्दल त्यानाही सन्मानीत करण्यात आले. कै. रविंद वसंत देसाई कलेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देसाई कलेकर कुटुबियांकडून श्री स्वामी समर्थ मठासाठी एलईडी बोर्ड भेट देण्यात आला, विनायक वासुदेव भोसले, सौतेजल तूकाराम करलकर वेगुर्ले, गोपाळ शाताराम गावकर याच्याकडुन योग भवनास आर्थीक सहाय्य करण्यात आले. सूत्रसंचालन राकेश केसरकर, मनीष नाईक, आनंद सावंत सर यांनी केले.










