LIVE UPDATES

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरची कार्यकारिणी बैठक

आमदार निलेश राणेंना निमंत्रण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 30, 2026 20:41 PM
views 67  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आणि कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन या कार्यक्रमाचे निमंत्रण कुडाळ- मालवणचे आमदार निलेश राणे यांना आज देण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी महाराष्ट्र सिंधुदुर्ग  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, दत्ता सामंत, जि.प.सदस्या दीपलक्ष्मी पडते, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरचे कोकण विभागीय उपाध्यक्ष  डाॅ. संतोष राणे, गवर्नीग कौन्सिल मेंबर अँड. नकुल पार्सॅकर, गाव तेथे उद्योजक या संकल्पनेचे समन्वयक राजेंद्र केसरकर उपस्थित होते.