LIVE UPDATES

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 16:31 PM
views 23  views

सावंतवाडी : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा व निसर्गाशी नाते जोडणारा रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच पाना-फुलांपासून बनविलेल्या विविध आकर्षक प्रतिकृतींचे प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या संकलित करून त्यांची आकर्षक मांडणी केली.

प्रत्येक रानभाजीचे नाव, उपयोग व पौष्टिक महत्त्व याची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील रानभाज्यांची ओळख होऊन त्यांच्या आरोग्यदायी व पौष्टिक गुणधर्मांची माहिती मिळाली. तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाने, फुले व इतर नैसर्गिक साहित्याचा वापर करून विविध सुंदर व कल्पक प्रतिकृती तयार केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने, कलागुणांनी व सर्जनशीलतेने साकारलेल्या या प्रतिकृती सर्वांचे विशेष आकर्षण ठरल्या.

या प्रदर्शनाला शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व परिश्रमाचे सर्वांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणाबद्दल जागरूकता, सर्जनशीलता आणि स्थानिक जैवविविधतेविषयी ज्ञान वृद्धिंगत होण्यास मदत झाली.या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. शेखर जैन सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर मॅडम, समन्वयक श्री अजय बांदेकर सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.