
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव आज बुधवार 24 व 25 डिसेंबर रोजी होणार आहे. बुधवार 24 रोजी ग्रामदैवत श्री देव रवळनाथाच्या मंदिरात जत्रोत्सव होईल तर गुरवारी 25 डिसेंबर रोजी श्री देव भैरीच्या मंदिरात जत्रोत्सव होणार आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व मानकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.











