
देवगड : देवगड तालुक्यातील नवज्योत कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मिठबांव यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते, २४ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी स्पर्धेचे ३१ वे वर्ष असून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मिठबांव सरपंच महादेव उर्फ भाई नरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सभापती सुनिल उर्फ भाई पारकर उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजेंद्र फाटक, उपसरपंच निवेदिता फाटक, उद्योजिका राजश्री लोके, ग्रामपंचायत सदस्या अक्षया लोके, आशुतोष कातवणकर, जिल्हा परिषद माजी सभापती सावी लोके, मनोहर मयेकर, परशुराम लोके, दत्ता मिठबांवकर (नॅशनल क्रिकेट कोच) शैलेश लोके, विनायक लोके, मालजी फाटक, दिवाकर फाटक, हरिष लोके, आशिष शेलटकर(पोलीस अधिकारी) सतिश जोशी, रमेश मालंडकर, भिसाजी जेठे, शंकर जेठे, भास्कर जेठेगांवकर, अनंत शिर्सेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
आमदार रवींद्र फाटक यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे. या क्रिकेट स्पर्धेला सर्व क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नवज्योत मित्रमंडळ, मिठबांव मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुशीलकुमार लोके यांनी केले आहे.














