
देवगड : देवगड तालुक्यातील तोरसोळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तोरसोळे बौद्धवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा भाजप सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते पार पडले. या रस्ता कामासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांचे स्थानिक ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी सरपंच तेजस्विनी पवार, माजी जि. प सदस्य सुभाष नार्वेकर, सुरेश राणे, देवदत्त कदम, सागर कदम, रमेश जाधव, ग्रामसेवक रामचंद्र राऊळ, दीपंकर कदम, विनोद पवार, सुनील जाधव, महेश पवार, मंगेश राणे, अरविंद पवार, उत्तम पवार, परशुराम पवार, सत्यवान पवार, रवींद्र पवार, संजय राणे, चंद्रकांत कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.











