
सावंतवाडी : सुप्रसिद्ध मूर्तिकार विलास मांजरेकर यांना ‘कोकण कलारत्न पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.
त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल परब यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक गुरुदास मठकर उपस्थित होते. श्री. मांजरेकर यांच मूर्तीकलेत मोठं योगदान आहे. गणेश मूर्तीसह इतरही मूर्त्या ते साकारतात. देश-विदेशातही त्यांचा कलेला मागणी असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे एक रत्न आहे.











