LIVE UPDATES

बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातेचे केसरकरांनी घेतलं दर्शन

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 11, 2026 20:43 PM
views 16  views

सावंतवाडी : नवरात्रोत्सव व घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या दुर्गामातेचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार केसरकर यांचे स्वागत केले. मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.