LIVE UPDATES

सावंतवाडी नरेंद्र डोंगर येथे वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पक्षी निरीक्षण

वाईल्ड कोकण सावंतवाडीच आयोजन | 21 प्रजातींची नोंद
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 11, 2026 20:26 PM
views 14  views

सावंतवाडी : वाईल्ड कोकण सावंतवाडी या संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पक्षी निरीक्षण हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये 34 पक्षी मित्र सहभागी झाले होते.

वाइल्ड कोकण या संस्थेचे अध्यक्ष  प्रा.धीरेंद्र होळीकर, उपाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव डॉ. गणेश मर्गज. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवृत्त वन अधिकारी श्री सुभाष पुराणिक, रवींद्र ओगले, अनंत बडे, नंदन बिरोडकर, रविकांत चिटणीस, सिद्धेश नाईक, ओमकार गावकर, प्रज्ञा गावकर, चैतन्य अडवलकर, वनश्री दोडामार्गचे अनुराग सिनारी, तुषार देसाई, पक्षीतज्ञ प्रवीण सातोसकर, अश्वेक गवस, सुरज गावडे, ओमकार गावडे, रोहित परब, तन्वी वैद्य, वनशक्ती मालवणचे यथार्थ खवणेकर, जानकी राऊळ, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. अतुल बोंद्रे, नवसो परब,  ऋषिकेश सावंत, मनाली पार्सेकर, कृपा परब, अथर्व बोंद्रे, श्लोक सावंत आदी उपस्थित होते.

सकाळी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत पक्षी निरीक्षण करण्यात आले. या पक्षी निरीक्षणामध्ये पांढऱ्या पोटाचा समुद्र  गरुड,सोनेरी रंगाचा हळद्या, पिवळ्या कंठाची चिमणी (सलीम अलीस स्पॅरो), ब्रॉन्झ ड्रॉन्गो ( कोतवाल ) अॅशी डॉन्गो,येलो ब्रॉड बुलबुल, ब्राऊन चिक फुलवेटा, व्हाईट थ्रॉटेड किंगफिशर, क्रिमसन बॅक सनबर्ड, ग्रे हेडेड बुलबुल, भारद्वाज, लाल गालाचा शिपाई बुलबुल,  काळटॉप हळद्या, मलाबार फ्लेम बॅक, हार्ट स्पॉटेड वूडपेकर, ऑरेंज मिनिवेट,स्मॉल मिनीवेट  आदी पक्षी पाहिले. नरेंद्र डोंगर हा जैवविविधतेने समृद्ध असून विविध पक्षी प्रजाती तेथे आढळतात.