
सावंतवाडी : पाणी पुरवठा विभागातील जोडाऱ्याचा व्हिडिओ नुकताच पाहिला. एखाद्या कर्मचाऱ्याकडून आत्महत्येची भाषा होण हे योग्य नसून नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेत पाणी पुरवठा विभागात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून गैरव्यवहारात सामील सर्वांची चौकशी करून कारवाई व्हावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असा इशारा माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी दिला आहे.
ते म्हणाले, जोडारी लाखे याचा व्हिडिओ आपण बघितला. एखाद्या कर्मचाऱ्याकडून आत्महत्येची गोष्ट होण योग्य नाही. नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होत असून ते योग्य नाही. पाणी पुरवठा विभागातील घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी. या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. अन्यथा, मुंबईहून आल्यानंतर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा श्री. परब यांनी दिला आहे.











