LIVE UPDATES

जि. प. सदस्य संदीप गावडेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 30, 2026 11:16 AM
views 25  views

सावंतवाडी : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. संदीप गावडे यांचे राजकीय गुरु भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियममध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. तळवडे, कोलगाव, आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच विविध सामाजिक उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात आले.

यावेळी राजकारणात पदापेक्षा पक्षनिष्ठा, विकासापेक्षा जनतेचा विश्वास आणि संघर्षातून घडलेले नेतृत्व अधिक महत्त्वाचे असते. हीच ओळख संदीप गावडे यांची असून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आणि जनतेच्या मनातील नेतृत्व आहेत. ते भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्या कार्याचा प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे, असे उद्गार भाजप युवा नेते विशाल परब यांनी काढले. सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी युवा नेते विशाल परब, भाजप नेते विनोद राऊळ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर,  उपसभापती गौरव मुळीक, जि. प. सदस्य मायकल डिसोजा, नितीन राऊळ, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब,  पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, विनेश तावडे, रंगनाथ गवस, वेंगुर्ला नगरसेवक सचिन शेटये, कास सरपंच प्रविण पंडीत,  माजी नगरसेवक राजू बेग, सावंतवाडी मंडल युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, शिरीष नाईक, धीरेंद्र म्हापसेकर, निलेश कुडव, संतोष बिले, समीर कुडाळकर,विजय रेडकर, पुंडलीक कदम आदींसह मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.