LIVE UPDATES

विष्णू परब यांच्या हस्ते प.पु. हरे कृष्ण पोळजी महाराजांची पाद्यपूजा

"गुरुपौर्णिमेचे" औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 30, 2026 10:20 AM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : "गुरुपौर्णिमेचे" औचित्य साधून वेंगुर्ला तालुका भाजप यांच्यामार्फत तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या हस्ते परमपूज्य हरे कृष्ण पोळजी महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली. संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज समरसता संकल्प अभियान भारतीय जनता पार्टीच्या वतीने ६५० व्या जयंती निमित्त संपूर्ण देशात ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी राबविण्याचा संकल्प केला आहे. त्या अंतर्गत भाजप वेंगुर्ला कमिटी कडून "गुरुपौर्णिमा" दिवसाचे औचित्य साधून आसोली येथील परमपूज्य हरे कृष्ण पोळजी महाराज यांच्या निवासस्थानी जाऊन तालुकाध्यक्ष विष्णू परब यांच्या हस्ते  त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. 

श्रीफळ, पंचफळे, शाल, वस्त्र,अर्पण करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, वेंगुर्ला नगरपालिका नगरसेवक सचिन शेटये, आसोली ज्येष्ठ भाजप पदाधिकारी प्रकाश रेगे, आसोली पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, आसोली भाजप ज्येष्ठ पदाधिकारी गुरु घाडी, वेंगुर्ला तालुका भाजप पदाधिकारी मारुती दोडशानट्टी, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर,शिरोडा ज्येष्ठ नेते अनिल गावडे, शिरोडा युवा नेता संतोष धानजी उपस्थित होते.