LIVE UPDATES

'स्टेपिंग स्टोन'च्या विद्यार्थ्यांचं तबला परीक्षेत उल्लेखनीय यश

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 19:39 PM
views 15  views

सावंतवाडी : येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था 'स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल'मधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तबला परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या कु. प्रजय सावंत याने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर 'विशेष प्रावीण्य' मिळवून संस्थेचा गौरव वाढवला. तसेच, कु. रुद्र देसाई यानेही परीक्षेत 'प्रथम श्रेणी' पटकावत आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे तबला शिक्षक श्री. प्रमोद मुंडये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या परीक्षेची जय्यत तयारी केली होती.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संचालक ॲड. रुजुल पाटणकर आणि मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले. तसेच, परीक्षेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना पुढील संगीत प्रवासासाठी व उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.