
सावंतवाडी : तालुक्यातील आजगावात खासगी कंपनीकडून मायनिंगसाठी सुरू असलेला ड्रोन सर्वेक्षणास ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी यशस्वीपणे शिष्टाई करत हा वाद चिघळू दिला नाही. ग्रामस्थांना देखील आपण तुमच्या बाजूने असल्याचा विश्वास दिला. ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत ड्रोन खाली पाडला होता तसेच संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांत बाचाबाची देखील झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना शब्द देत यशस्वी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.










