LIVE UPDATES

NFSM अंतर्गत मोंड येथे नाचणी बियाणे वाटप

घरघंटींचेही वितरण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 20, 2026 12:25 PM
views 38  views

देवगड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत ग्रामपंचायत मोंड येथे नाचणी पिकाच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे होते. यावेळी शामल अनभवणे, अभय बापट, गणेश तिर्लोटकर, आरती पाटील, संभाजी जाधव, दीपक सांगोळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक कृषी अधिकारी दीपक सांगोळे यांनी उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच नाचणी बियाणे वितरण कार्यक्रमाची माहिती दिली. ग्रामपंचायत मोंडच्या प्रशासकीय समिती सदस्यांनीही आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी गणेश राणे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच २३ जून रोजी होणाऱ्या नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सेस फंडातून घरघंटीसाठी निवड झालेल्या दोन लाभार्थ्यांना घरघंटींचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात कृषी विभागाच्या वतीने ‘गोकृपा अमृत’ तयार करण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.