LIVE UPDATES

बांदा - पानवळ मार्गावर एसटीचा अपघात

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 08, 2026 15:42 PM
views 85  views

सावंतवाडी : बांदा - पानवळ मार्गावर आज दुपारी एसटी बसचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या मोठ्या कंटेनरला हूल देताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या झाडीत घुसली. अपघातात बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या कंटेनरला जागा करून देण्याच्या प्रयत्नात चालकाने बस बाजूला घेतली. यावेळी बस घसरून झाडीत जाऊन आदळली. अपघातानंतर काही काळ वाहतूक मंदावली होती. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.