LIVE UPDATES

मतांच्या माध्यमातून दिलेलं चोख उत्तर विसरला का ?

काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांना भाजपचे उपक्रम दिसणार कसे ? : आनंद नेवगी
Edited by: विनायाक गांवस
Published on: June 08, 2026 15:36 PM
views 104  views

सावंतवाडी : स्वच्छता मोहिमेवर काही व्यक्तींनी टीका केली. मात्र, देव पाटेकर मंदिर परिसर हा ऐतिहासिक संस्थानकालीन परिसरात येतो. जर या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळाची स्वच्छता होत असेल तर नेमका आक्षेप कशाब‌द्दल आहे ? असा सवाल सभापती आनंद नेवगी यांनी केला. तर अशा संकुचित विचारसरणीला सावंतवाडीच्या सुजाण जनतेने नगराध्यक्ष व नगरसेवक या दोन्ही पदावर मतांच्या माध्यमातून चोख उत्तर दिले आहे, हे त्या विसरल्या का ? असा टोला हाणत. काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे उपक्रम दिसणार कसे असंही श्री. नेवगी यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजवाडा व देव पाटेकर मंदिर परिसर सावंतवाडीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत श्रमदान केले. या पवित्र ऐतिहासिक व धार्मिक स्थळाचा परिसर स्वच्छ करून शिवभक्तीचे एक वेगळे उदाहरण भारतीय जनता पार्टी च्या सर्व नगरसेवकांनी जनतेसमोर ठेवले. सावंतवाडीच्या प्रथम नागरिक आणि उपस्थित नगरसेवकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्तीच्या निमित्ताने संपूर्ण भारत भर वृक्षारोपण दिन, योग दिन, असे अनेक उपक्रम राबवण्यास प्रत्येकास संगितलं आहे. परंतू, काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे उपक्रम दिसणार कसे ? असा सवाल त्यांनी केला. 

नेवगी म्हणाले, याआधीही सावंतवाडी नगरपालिके‌द्वारे शहरातील विविध भागांत सलग सात दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी टीका करणारे आता का गप्प होते ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 'स्वच्छ भारत' हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून, जेव्हा जेव्हा शहराला गरज भासेल, तेव्हा तेव्हा स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शिवराज्यभिषेक दिनाचे निमित साधून ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करून एक सकारात्मक संदेश सावंतवाडीकरांपर्यंत पोहोचवण्यात आला असून भविष्यातही शहराच्या सौंदर्गीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी अशीच तत्परता कायम राहील असे मत, सभापती आनंद नेवगी यांनी व्यक्त केले आहे.