LIVE UPDATES

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाडमध्ये शासनमान्य डिप्लोमा प्रवेश सुविधा केंद्र

अद्यावत सुविधा केंद्रमार्फत फॉर्म भरण्याची संधी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 08, 2026 17:02 PM
views 27  views

मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एम आय टी एम) या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमा इंजीनियरिंग साठी प्रवेश प्रक्रिया केंद्र म्हणून शासनाने या संस्थेची निवड केली आहे. शासनाच्या तंत्रशिक्षण संचनालया तर्फे ऑनलाइन पोर्टल च्या माध्यमातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या भविष्याकडे नेण्यासाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. येथे फॉर्म भरण्यापासून ते योग्य तंत्र शाखा निवडण्यापर्यंत सर्व मार्गदर्शन तंज्ञान मोफत दिले जाते यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी प्रवेशासाठी नोंदणीची अंतिम तारीख 22 जून, अर्ज दुरुस्तीची अंतिम तारीख 30 जून असून, अंतिम गुणवत्ता यादी 2 जुलैला जाहीर होईल. पॉलिटेक्निकल मध्ये सातत्याने नियमित उपक्रम राबवण्यात येतात. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची माहिती व ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा विनामूल्य आहे.

या सुविधा केंद्रामधील अद्यावत संगणक प्रणाली, हाय स्पीड इंटरनेट अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया कागदपत्रे तपासणी शाखा निवड याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतात. या सुविधा केंद्राचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन (एम आय टी एम) कॉलेजचे डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे यांनी केले आहे.