
सावंतवाडी : झाराप रेल्वे स्टेशनवरून वास्को, गोवा येथे जात असलेली खनिज सदृश्य माती नक्की कुठली ? हा प्रश्न जनतेला संभ्रमात टाकणारा आहे. कुठल्याही परवानग्या न घेता मायनिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. जिल्हा खनिकर्म विभाग, महसूल विभाग यांची या प्रकाराला मूकसंमती असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
फार मोठ्या प्रमाणावर शासनाच्या महसूल चोरीचा हा प्रकार आहे. पण, पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. गेल्या दहा बारा दिवसांत आठ ते दहा रेल्वे ट्रेन भरून ही खनिज सदृश्य माती पाठवली गेली आहे. दिवसाला पाचशे डंपर्स भरून ही माती झाराप रेल्वे स्टेशनवर येऊन टाकली जात आहे. ही आडाळी येथील अवैध मायनिंग चोरीची माती आहे असा एक समज आहे. पण, तळवणे कोंडूरा येथून ही खनिजमाती आणली जात आहे. कुठल्याही परवानग्या न घेता, कुठलेही नियम अटी न पाळता हे मायनिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. जिल्हा खनिकर्म विभाग, महसूल विभाग यांची या प्रकाराला मूकसंमती असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. फार मोठ्या प्रमाणावर शासनाच्या महसूल चोरीचा हा प्रकार आहे. पण, पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे अस मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.










