LIVE UPDATES

नगराध्यक्षा - उपनगराध्यक्षांनी प्रभागात जात जनतेच्या समस्या घेतल्या जाणून

Edited by: विनायाक गांवस
Published on: May 31, 2026 18:30 PM
views 82  views

सावंतवाडी : शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातच्या निमित्ताने नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांसह सभापती, भाजप नगरसेवकांनी १० ही प्रभागात जात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. मन की बात कार्यक्रमांचे आयोजन बुथ प्रमुखांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. 

यावेळी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी देखील जनतेत जात समस्या जाणून घेतल्या. याचे आयोजन शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर व मन की बात संयोजक सभापती प्रतिक बांदेकर यांच्या पुढाकाराने या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रभाग निहाय भेट देणार असल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर 'मन की बात'च्या निमित्ताने वॉर्ड भेटीला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, युवराज लखमराजे भोंसले, सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती प्रतिक बांदेकर, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते ‌