LIVE UPDATES

वडापावनंतर आता महाराष्ट्रात ‘फिश पाव’ : नितेश राणे

Edited by: विनायाक गांवस
Published on: May 31, 2026 20:43 PM
views 72  views

देवगड : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेत ‘फिश पाव’ या नव्या संकल्पनेची माहिती दिली. वडापावच्या धर्तीवर तयार करण्यात येणारा ‘फिश पाव’ राज्यभर लोकप्रिय करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग विशेष स्टॉल्स उभारण्याच्या तयारीत आहे.

या उपक्रमामुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळण्यासोबतच मच्छीमारांना नवी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. राज्यभर ‘फिश पाव’ पोहोचवण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे राणे यांनी सांगितले.