LIVE UPDATES

स्वामी समर्थांच्या पादुकांचे भक्तीमय वातावरणात पूजन

Edited by: विनायाक गांवस
Published on: May 29, 2026 19:40 PM
views 32  views

सावंतवाडी : येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या "श्री औदुंबर स्वामी मंदिरात" नुकतेच श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींच्या पवित्र पादुकांचे अत्यत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात  पूजन करण्यात आले. या पूजेचा मान सैनिक बँकेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांना  देण्यात आला. 

या सोहळ्याला उपस्थित असलेले गुरु आनंद ब्रह्म यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, सर्वांनी समाजसेवा आणि अन्नदान यांसारखी सत्कर्मे करून स्वामी भक्तीचे कार्य पुढे न्यावे, असे आवाहन केले. या सोहळ्याच्या निमित्ताने स्वामी भक्तांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभलेल्या, तसेच प्राचीन अग्नी-उपासनामार्ग पुनरुज्जीवित करणाऱ्या "परमसद्गुरु श्री गजानन महाराज" यांच्या चिन्मयपादुका तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या भागात परिक्रमेसाठी आल्या होत्या. यावेळी उपस्थित स्वामी भक्तांच्या उपस्थितीत त्या चिन्मय पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण, सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, जिल्हा बँकेचे संचालक रवी मडगावकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, दीपक म्हापसेकर, रंजना निर्मळ उत्सव समितीचे अमोल टेंबकर, भुवन नाईक, अनिकेत आसोलकर, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे, प्रणव तारी, यश गाटे, केतन सावंत, ओम टेंबकर, अमित राऊळ, अदिती सावंत, सुरेखा पवार, पुजा धोत्रे, स्नेहल तेरेगावकर आदींसह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.