कर्णबधीर मुलांच्या शाळेत निलेश राणेंचा वाढदिवस साजरा

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 16, 2026 17:58 PM
views 12  views

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस-कोंडुरे येथील कर्णबधीर व मतिमंद मुलांच्या शाळेत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी तालुका शिवसेना महिला आघाडीतर्फे साजरा करण्यात आला. मुलांनी व संस्थेच्या संस्थापक व संचिलिका श्रीम .रेखाताई गायकवाड  यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी मुलांना खाऊ , केक बिस्कीट चॉकलेट्स तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी २५ हजार रूपये नवीन इमारत बांधकामसाठी देणगी दिली .यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत कविटकर, सावंतवाडी महिला तालुकाप्रमुख सौ .सौदागर नगरसेविका सौ शर्वरी धारगळकर सौ स्नेहा नाईक ह्युमन राईट जिल्हाध्यक सौ शिवानी पाटकर तालुक सचिव सौ . सुप्रिता धारणकर व सदस्य सौ पूजा नाईक व भारती परब व आरोस सरपंच श्री .नाईक हजर होते. यावेळी शाळेच्या  मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार मानले. मुलांनी स्वतः बनविलेली ग्रीटिंग कार्डस आमदार निलेश राणे यांना पाठविण्यात आली.