विलवडे - वाफोली गावातील क्वारी व क्रशरचा स्थानिकांना त्रास

ग्रामस्थांचं उद्या धरणे आंदोलन
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 16, 2026 18:47 PM
views 13  views

सावंतवाडी : विलवडे आणि वाफोली गावातील क्वारी व क्रशर व्यावसायिकांनी शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या भागातील जनतेला नुकसानीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे अनेकवेळा लक्ष वेधण्यात आले. मात्र, केवळ आश्वासनापलीकडे कोणतीही कार्यवाही होत नसल्याने तीव्र संताप आहे. त्यामुळे या बेकायदा क्वारी व क्रशर बंद न केल्यास मंगळवार १७ मार्च रोजी या क्वारी व क्रशरच्या मार्गावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा विलवडे ग्रामस्थांनी दिला आहे.

शासनाचे नियम धाब्यावर बसून या क्वारी व क्रशर सुरू असून याकडे महसूल खाते दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांची तक्रार आहे. क्वारी व क्रशर व्यावसायिकांकडून शासनाच्या नियम व अटींचे उल्लंघन झाल्यामुळे महसूल विभागाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधितांचे परवाने रद्द करावे, यासाठी धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.