उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर

Edited by:
Published on: March 16, 2026 18:50 PM
views 25  views

मुंबई : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे व सेंट्रल रेल्वे यांच्या समन्वयाने उन्हाळी हंगाम २०२६ दरम्यान मुंबई–मडगाव मार्गावर दोन विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई CSMT – मडगाव विशेष (साप्ताहिक) गाडी क्र. 01171 ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर गुरुवारी रात्री 00:20 वाजता १६ एप्रिल ते ११ जून २०२६ दरम्यान सुटेल व त्याच दिवशी 15:15 वाजता मडगांव जंकशन येथे पोहोचेल.

परतीची गाडी क्र. 01172 ही मडगाव जंक्शन येथून दुपारी 16:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 03:45 वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष (साप्ताहिक) गाडी क्र. 01119 ही विशेष गाडी Lokmanya Tilak Terminus येथून दर शुक्रवारी रात्री 00:55 वाजता १७ एप्रिल ते १२ जून २०२६ दरम्यान सुटेल व त्याच दिवशी 15:15 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. परतीची गाडी क्र. 01120 ही मडगाव जंक्शन येथून दुपारी 16:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 03:30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे

या दोन्ही गाड्या दादर रेल्वे स्टेशन , ठाणे रेल्वे स्टेशन , पनवेल रेल्वे स्टेशन , पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरदा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांवर थांबणार आहेत.

डबे व्यवस्था

मुंबई CSMT – मडगाव विशेष : एकूण २२ डबे (एसी 2 टियर – १, एसी 3 टियर – ६, स्लीपर – ९, जनरल – ४, एसएलआर – २).

लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष : एकूण २१ एलएचबी डबे (फर्स्ट एसी – १, एसी 2 टियर – ३, एसी 3 टियर – ७, स्लीपर – ८, जनरेटर कार – २).आरक्षण 

गाडी क्रमांक 01172 आणि 01120 साठीचे आरक्षण १७ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रे तसेच IRCTC Rail Connect आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांनी उन्हाळी सुट्टीत कोकणात प्रवासासाठी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.