SSI कॉम्प्युटरला MS-CIT सुपर परफोर्मिंग सेंटर पुरस्कार

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 16, 2026 17:46 PM
views 15  views

सावंतवाडी : कुडाळ येथे आयोजित MKCLच्या विभागीय मेळाव्यात SSI कॉम्प्युटर सेंटरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MS-CIT सुपर परफॉर्मिंग सेंटर या पुरस्काराने गौरविण्यात आले. MKCLचे संचालकीय व्यवस्थापक श्री. पांडे  यांच्या हस्ते SSI कॉम्प्युटरचे संचालक रघुनाथ तानावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सन २०१० पासून सलग १६ वर्षे SSI कॉम्प्युटर सेंटरला सुपर परफॉर्मींग सेंटर म्हणून सन्मान मिळत आहे. सन २०२५ मध्ये तब्बल 387 विद्यार्थ्यांनी MS-CIT कोर्ससाठी प्रवेश घेतला असून संस्थेने यशाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त MS-CIT तसेच MKCL व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त KLIC च्या विविध व्यावसायिक कॉम्प्युटर कोर्सेसमध्ये २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी रिजनल लीड सेंटरचे मंगेश जाधव, अतुल पतोडे, अमित रानडे, संतोष कोलते आणि प्रणव तेली उपस्थित होते. SSI कॉम्प्युटर सेंटरच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मान्यवरांनी अभिनंदन केले.