सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

डॉग बाईटच्या ४ रुग्णांची नोंद
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 15, 2026 12:05 PM
views 30  views

सावंतवाडी : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून आज सकाळपासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉग बाईटच्या ४ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून यावर उपाय योजना करण्यासाठी बैठका देखील घेतल्या गेल्यात. मात्र, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबत नसून आज सकाळपासून ४ रूग्णांची नोंद उप जिल्हा रूग्णालयात झाली आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याने भितीच वातावरण परिसरात निर्माण झाल आहे