LIVE UPDATES

पखवाज अलंकार परीक्षेत सचिन पांगमची दैदिप्यमान कामगिरी

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ; 11 वर्षांच्या कठोर साधनेला यशाचे फळ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 29, 2026 20:28 PM
views 25  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आरोस-दांडेली गावचा सुपुत्र आणि तालविश्व संगीत विद्यालयाचा विद्यार्थी सचिन प्रमोद पांगम याने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पखवाज अलंकार परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले.

सचिन पांगम गेल्या 11 वर्षांपासून तालवाद्य संगीत विद्यालयाचे संचालक व गुरुवर्य मनीष तांबोस्कर यांच्याकडे पखवाज वादनाचे प्रशिक्षण घेत आहे. तसेच गुरुवर्य निलेश पेडणेकर आणि कै. पं. गोविंद भिलारे यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

सचिनच्या या यशाबद्दल चिंतामणी संगीत विद्यालयाचे संचालक निलेश पेडणेकर, माऊली संगीत विद्यालयाचे संचालक वैभव परब तसेच गुरुकुल संगीत विद्यालयाचे संचालक संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पखवाज वादनाच्या क्षेत्रात सचिन पांगम याने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.