
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून सावंतवाडी तालुक्यातील महाविद्यालयांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुक्यातील अनेक नामांकित शिक्षण संस्थांनी १०० टक्के निकाल लावत यशाची परंपरा कायम राखली आहे. तालुक्याचा निकाल ९३.१२ टक्के एवढा लागला आहे.
यात श्री पंचम खेमराज महाविद्यालय ८९.६०%, राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज ९५.४६%, खेमराज मेमोरियल, बांदा ९५.९५%, जनता विद्यालय, तळवडे ७५.००%, कळसुलकर हायस्कूल ६८.५७%, विद्याविहार इंग्लिश स्कूल, ओटवणे ९२.३०%, माध्यमिक विद्यालय, सांगेली८९.१०%, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ९७.५०%, नेमळे हायस्कूल, बांदा १००.००%, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ९६.७७%, शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा (ज्युनिअर कॉलेज) ९०.००%, मिलाग्रीस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज १००.००%, चौकुळ इंग्लिश स्कूल १००.००%, गव्हर्नमेंट आय.टी.आय., सावंतवाडी ८४.६१%, खेमराज मेमोरियल, बांदा(MCVC) ९३.९३% एवढा लागला असून नेमळे हायस्कूल (बांदा), मिलाग्रीस हायस्कूल आणि चौकुळ इंग्लिश स्कूल या तीन विद्यालयांनी १०० टक्के निकाल लावून अव्वल स्थान पटकावले आहे. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे, संस्थाचालकांचे आणि शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.











