शेर्लेतील गणेश घाट बांधकामाचं भूमिपूजन

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2026 15:44 PM
views 10  views

सावंतवाडी : शेर्ले येथील तेरेखोल नदी जवळ गणेश घाट बांधकाम या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ फोडून या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी शेर्ले पंचायत समिती सदस्य महेश धुरी,शेर्ले सरपंच सौ. प्रांजल जाधव,माजी सरपंच उदय धुरी,माजी सरपंच दयानंद धुरी, उप सरपंच दीपक नाईक,ग्रामपंचाया सदस्य श्रावणी धुरी,वासुदेव धुरी,गुरु सावंत,युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, मागासवर्गीय सेल युवा  तालुका प्रमुख प्रशांत जाधव,सागर धुरी,नितीन जोशी,बाळा धुरी,विनोद सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते