
सावंतवाडी : मिलाग्रीस ज्युनियर कॉलेजने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान आणि वाणिज्य दोन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रशालेतून प्रथम क्रमांक मोहम्मद अफाग नियाज नाईक ९१.३३% याने प्राप्त केला असून द्वितीय रॉक्सन डॉमनिक डिसोजा ७९.००%, तृतीय कुमारी आमना नसीर गवंडी हिने ७५.५०% हीने प्राप्त केला आहे.
विज्ञान शाखेतून एकूण ४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्वच्या सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेत कुमारी आमना नसीर गवंडी हिने ७५.५०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कुमार एरिक नेल्सन फर्नांडिस ६९.८३% द्वितीय, कुमार लाजरस गॉडविन मुनीस ६९.६७% तृतीय क्रमांक पटकावला आहे.
वाणिज्य शाखेचा निकालही १०० टक्के लागला असून, प्रविष्ट झालेले सर्व ९ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या शाखेत कुमार मोहम्मद अफाग नियाज नाईक याने ९१.३३% गुणांसह महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. कुमार रॉक्सन डॉमनिक डिसोजा ७९.००% द्वितीय, तृतीय एंजल जॅक्सन फर्नांडिस ७१.६७% आलाय. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.










