
कणकवली : कणकवली तालुक्यातून एकूण १८२० विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातील १७३२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९५.९५ टक्के लागला. तालुक्यातील तब्बल चार कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कळसुली, कनेडी, मराठे हायस्कुल फोंडाघाट, तळेरे मालंडकर कॉलेज या चार कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.










