सेवानिवृत्त कर्मचारी संघाकडून डॉ. दिनेश नागवेकर यांचा सत्कार

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 22, 2026 19:29 PM
views 19  views

सावंतवाडी : सावंतवाडीष दोडामार्ग तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाकडून संघटनेचे सदस्य सनदी अभियंता, वास्तुआचार्य आणि स्थावर संपदा विकासक प्रा. डॉ. दिनेश नागवेकर यांचा सत्कार माजी शालेय शिक्षण मंत्री व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी अध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 

यावेळी व्यासपिठावर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पणदुरकर, सचिव संभाजी कांबळे, खजिनदार सुभाष गोवेकर, जीवनरक्षा हॉस्पिटलचे -डॉ. शंकर सावंत, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण, सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, सावंतवाडी नगरपालिकेचे नियोजन व पर्यावरण सभापती आनंद नेवगी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राजेंद्र बिर्जे, गुरुदास पेडणेकर, दत्ताराम सडेकर आदी उपस्थित होते. डॉ. दिनेश नागवेकर यांनी २५ वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेवून बांधकाम व्यवसाय सुरु केला. निवृत्तीनंतर ११ विद्यापीठामधून विविध अभ्यासक्रमाचे व विषयाचे प्रशिक्षण घेवून आपली शैक्षणिक पात्रता वाढविली. वीस गृहनिर्माण संस्थाची निर्मिती केली. त्यापैकी नऊ गृहनिर्माण संस्था या फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करुन ३८० ते ९०० रु. चौ. फूट दराने शासकीय कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेवून संघटनेच्या वार्षिक सभेत व पेन्शनर्स डे निमित्त हा सत्कार करण्यात आला.

निवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सभा सावंतवाडी येथील सैनिक मुलांच्या वसतीगृह हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी बहुसंख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मेघना राऊळ यांनी केले.