
वैभववाडी : लोरे नं. २ येथे पाच वाड्यांसाठी गणपती विसर्जन घाट बांधकामाचा आज(ता.२२) शुभारंभ झाला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निधीतून तसेच जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे. लोरे डोंगरेवाडी, नाचणेकरवाडी, हेळेवाडी, दुधमवाडी आणि सकंपाळवाडी या पाच वाड्यांसाठी गणपती विसर्जन घाट उभारण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.ग्रामस्थांच्या मागणीनुसार श्री.रावराणे यांनी मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून या कामासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
या कामाचे भूमिपूजन आज दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रिद्धी रितेश सुतार, पंचायत समिती सदस्य सिद्देश रावराणे, सरपंच विलास नावळे, रितेश सुतार, बूथ अध्यक्ष प्रकाश गवानकर, भरत मांजलकर, उद्योजक अनंत मांजलकर, सत्यजित रावराणे, अभिजित रावराणे, गुरुराज डोंगरे, महेंद्र रानम, चंद्रकांत सावंत, अजय मांडवकर, यशवंत नाचणेकर, संदीप वारेसे, भास्कर पांचाळ, प्रकाश संकपाळ, अशोक सावंत, सुनील आग्रे आदी उपस्थित होते. या घाटाच्या बांधकामामुळे पाचही वाड्यांतील नागरिकांना गणपती विसर्जनासाठी सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.











