
सावंतवाडी : संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त महास्वच्छता अभियान आज प्रभाग क्रमांक ६ मध्ये राबविण्यात आले. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
प्रभाग ६ मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. आपल शहर, आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्याची स्वतःची जबाबदारी समजून सर्वांनी एकत्र मिळून स्वच्छ काम करूया असं आवाहन प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी केलं. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्व सामाजिक संस्था,न.प.कर्मचारी वर्ग, महिला बचत गट व रहिवासी अधिकारी आरोग्य विभाग यांचे नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आभार मानले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, परिक्षित मांजरेकर, न.प.चे विनोद सावंत, गजानन परब तसेच अनिकेत पाटणकर, संकल्प धारगळकर आदींसह सालईवाडा येथील नागरिक उपस्थित होते.











