
सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लर्न अँड ग्रो’ या उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि.१० जानेवारी रोजी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडणार आहे. दोन सत्रांमध्ये आयोजित या स्पर्धेचे पहिले सत्र सकाळी १० ते १२ व दुसरे सत्र दुपारी २.३० ते ४.३० असे राहिल.
स्पर्धा तीन वयोगटांमध्ये होणार असून पहिला गट प्री-प्रायमरी, दुसरा गट पहिली ते तिसरी आणि तिसरा गट चौथी, पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असून विद्यार्थ्यांनी रंगसामग्री सोबत आणायची आहे. चित्र शाळेकडून दिले जाईल. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल. नावनोंदणीसाठी ९४२२३८६६१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शाळेच्यावतीने करण्यात आले आहे.











