LIVE UPDATES

भटवाडी जि. प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2025 19:38 PM
views 19  views

सावंतवाडी : जि. प. शाळा नंबर ६ भटवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं. ६ मध्ये शाळा प्रवेशोत्सवावेळी कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, मुख्याध्यापक केशव जाधव, शिक्षिका सायली लांबर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्ष पूनम तुयेकर, ईश्वरी तेजम, मुख्याध्यापक केशव जाधव, सहाय्यक शिक्षिका सायली लांबर, श्रीम. अनिशा राणे, गुरुप्रसाद तेजम, अनुष्का केरकर, सौ. सावंत, बालवाडी शिक्षिका गावडे मॅडम, मयुरेश तुयेकर, श्रीम. संगीता चव्हाण, सौ. साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते. नगरसेविका दिपाली भालेकर यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाप्रसंगी मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप भालेकर यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक केशव जाधव व आभार सहाय्यक शिक्षिका सायली लांबर यांनी मानले.