LIVE UPDATES

Devgad News : युथ फोरमतर्फे १८ ऑक्टोबरला ‘सन्मान नवदुर्गांचा’

नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय पोर्ट्रेट रांगोळी स्पर्धा; लवकरच युवा महोत्सव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 29, 2026 19:58 PM
views 38  views

देवगड : युथ फोरम, देवगडतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त १८ ऑक्टोबर रोजी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘सन्मान नवदुर्गांचा’ या उपक्रमातून विशेष गौरव करण्यात येणार आहे. तसेच १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान भव्य राज्यस्तरीय पोर्ट्रेट रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून, या स्पर्धेचे हे सलग सहावे वर्ष आहे. याशिवाय लवकरच देवगडमध्ये भव्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली.

युथ फोरमची विशेष सर्वसाधारण सभा शेठ म. ग. हायस्कूल येथे अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, सहसचिव रसिका सारंग, ऋत्विक धुरी, खजिनदार सागर गांवकर, कार्यकारिणी सदस्य भूषण दातार, शहर अध्यक्ष ओमकार सारंग यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना अॅड. माणगांवकर यांनी सांगितले की, सहसचिव रसिका सारंग यांच्या संकल्पनेतून ‘सन्मान नवदुर्गांचा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्थानिक युवकांना विविध व्यावसायिक व आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सभेत संस्थेच्या कार्यकारिणी व विविध समित्यांमध्ये नूतन पदनियुक्त्याही करण्यात आल्या. कार्यकारिणी सदस्यपदी आज्ञा अभिषेक कोयंडे व सोहम सुनील पारकर, सल्लागार व विशेष निमंत्रित कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. तन्मय सुनील आठवले व सुमित कुबल यांची निवड झाली. तसेच देवगड-जामसंडे शहर कार्यकारिणी, देवगड कॉलेज युनिट, नाट्य महोत्सव समिती व सोशल मीडिया विभागातही नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.