LIVE UPDATES

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सहअध्यक्षपदी संदीप साटम

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 10:24 AM
views 23  views

देवगड : खासदार नारायण राणे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनंतर संदीप साटम यांची कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते' योजनेच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्तीची घोषणा केली.नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संदीप साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानले.

योजनेच्या माध्यमातून शासन, शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला ही जबाबदारी मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्येही सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.