LIVE UPDATES

व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी संदीप गावडेंकडून आर्थिक मदत

तळवडे येथे शॉर्टसर्किटमुळे दुकानाला लागली होती भीषण आग
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 18, 2026 17:46 PM
views 49  views

सावंतवाडी : तळवडे येथील व्यावसायिक विजय कुंभार यांच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या संकटामुळे अडचणीत आलेल्या श्री. कुंभार यांना पुन्हा एकदा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी तातडीच्या मदतीची गरज होती. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संदीप गावडे यांच्या पुढाकारातून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी, तळवडे यांच्या माध्यमातून ही मदतीची रक्कम श्री. कुंभार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे कुंभार यांना पुन्हा आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, शंकर सावंत, विकास गावडे, प्रेमानंद डिचोलकर, मधुसूदन तळवणेकर, दीपक कोरगावकर, सुशांत गावडे, सुभाष पेडणेकर यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.